kolhapur Water Supply | निम्म्‍‍या कोल्‍हापूरचा पाणीपुरवठा आज बंद, उद्या अपुरा

kolhapur Water Supply |
kolhapur Water Supply | निम्म्‍‍या कोल्‍हापूरचा पाणीपुरवठा आज बंद, उद्या अपुरा
Published on
Updated on

कोल्हापूर : कसबा बावडा येथील संप हाऊसमध्‍ये गळती काढण्‍याचे काम करण्‍यात येणार असल्‍याने सोमवारी (दि. १३) निम्‍म्‍या शहराचा म्‍हणजेच संपूर्ण ई वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही कमी दाबाने म्‍हणजेच अपु‍रा पाणीपुरवठा होणार आहे.

कसबा बावडा येथील संप हाऊसची व बी.पी.टी. टँकची गळती काढण्याचे काम सोमवारी घेण्यात येणार आहे. त्‍यामुळे कावळा नाका वितरण व्‍यवस्‍थेवर अवलंबून असणाऱ्या भगवा चौक, संपूर्ण बावडा, मधुमालती कॉलनी, डी. वाय. पाटील रोड, बिरंजे पाणंद, कदमवाडी, चौगले गल्ली, उलपे मळा, कनाननगर, पोवार मळा, रमणमळा, न्यू पॅलेस, धैर्यप्रसाद, कारंडे मळा, सर्किट हाऊस, ताराबाई पार्क, लाईन बाजार, सदर बाजार, विचारे माळ, कावळा नाका, टेंबलाईवाडी, स्टेशन रोड, बापट कॅम्प, लोणार वसाहत, रुईकर कॉलनी, रुक्मिणीनगर, मार्केट यार्ड, लिशा हॉटेल, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, बाबर हॉस्पिटल, शिवाजी पार्क या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news