'Haldi-Kumku' ceremony of 'Pudhari' Kasturi Club and 'Star Pravah' tomorrow
दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व ‘स्टार प्रवाह’चा उद्या ‘हळदी-कुंकू’ सोहळा

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व ‘स्टार प्रवाह’चा उद्या ‘हळदी-कुंकू’ सोहळा

इचलकरंजीतील तांबे माळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक हॉल येथे रंगणार सोहळा
Published on

इचलकरंजी : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व स्टार प्रवाह वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता तांबे माळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक हॉल येथे महिलांसाठी हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन केले आहे. संक्रांतीच्या आनंदाला मनोरंजन, परंपरा आणि सामाजिक भान याची जोड देण्यासाठी हळदी-कुंकू हा सोहळा साजरा होणार आहे.

वस्त्रनगरीत होणार्‍या या कार्यक्रमात मराठी संस्कृतीचा सन्मान व सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम कस्तुरींना अनुभवता येणार आहे. स्टार प्रवाह वरील ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेतील लक्ष्मीबाई म्हणजे चैत्राली गुप्ते तसेच छोटी सावित्री तक्षा शेट्टी या कलाकारांची उपस्थिती हे उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. चाहत्यांसोबत थेट संवाद, गप्पा, रिल्स आणि मजेशीर क्षणांमुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित होणार आहे. यासह महिलांसाठी नियोजित स्पॉट गेममुळे सोहळ्याला वेगळीच रंगत येणार आहे. अस्सल मराठमोळा साजश्रृंगार (नऊवारी, शेला व पारंपरिक दागिने) तसेच सामाजिक भान जागवणारी थिम महिलांच्या कलागुणांना व विचारांना व्यासपीठ देणारी आहे.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या सभासदांसाठी लाल किंवा पिवळी साडी, हिरव्या बांगड्या अशी थिम ठेवण्यात आली आहे. उपस्थित सर्व कस्तुरींना माहेर वन ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरीकडून विशेष आकर्षक वाण दिले जाणार आहे. तसेच भरपूर बक्षिसे व भेटवस्तू मिळण्याची संधी महिलांना मिळणार आहे. यासह प्रसिद्ध अँकर, लेखिका, एकांकिकाकार आणि ‘होम मिनिस्टर’ फेम मेघना झुंझम यांचा भन्नाट गेम शो रंगणार आहे. त्यामुळे संक्रांतीचा उत्सव, सेलिबि—टींची भेट, पारंपरिक सौंदर्य आणि आनंदाची उधळण अनुभवता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : प्राची कचरे - 9890978109.

महिलांची आवडती पसंती म्हणजे माहेर फॉर्मिंग ज्वेलरी दालन

माहेर फॉर्मिंग ज्वेलरीचे एक ग्रॅम व दोन ग्रॅम दागिन्यांचे भव्य दालन कराडसह ईश्वरपूर, इचलकरंजी शहरांमध्ये महिलांसाठी उभे करण्यात त्यांना यश आले आहे. कोपर्डी हवेली (ता. कराड) येथील सौ. सारिका सचिन चव्हाण यांनी जिद्दीच्या व विश्वासाच्या जोरावर हा व्यवसाय उभारला आहे. माहेर ज्वेलरीच्या सर्व शाखांमध्ये महिलांचे आवडते दागिने बांगड्या, कोल्हापुरी साज, ठुशी, कानातले, राणीहार, मंगळसूत्र अशा 20 हजारांहून अधिक असंख्य व्हरायटी आहेत. दागिन्यांतील चोखळंद नजर ग्राहकांशी असलेले मैत्रीपूर्व नाते, सामाजिक कार्याची आवड तसेच तत्पर सेवा देण्याचे कसब यामुळे सारिका चव्हाण ‘माहेर वन ग्रॅम ज्वेलरी’च्या दागिन्यांप्रमाणेच कराडसह ईश्वरपूर, इचलकरंजी शहरांतील महिलांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.

‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ सामाजिक क्रांतीचा प्रवास

‘स्टार प्रवाह’वर प्रसारित होणारी ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ ही ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारी ही मालिका आहे. सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, स्त्री शिक्षणाचा पाया घालण्यासाठीचा त्याग, जोतिराव फुलेंचा समाजातील अन्याय, अंधश्रद्धा व विषमतेविरोधातील चळवळ प्रभावीपणे मांडली आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले व डॉ. अमोल कोल्हे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत पुण्यातील भिडे वाड्यातील मुलींच्या पहिल्या शाळेपासून सत्यशोधक समाजाचे कार्य, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण व सामाजिक सुधारणांचा व्यापक पट उलगडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news