kolhapur | हृदयविकाराचा झटका, रुग्णवाहिकेतून नेताना मोटारीला धडक अन् आजोबा जागीच गतप्राण

लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे विचित्र अपघात
घटनास्थळी अपघातग्रस्त वाहने व नागरिकांची गर्दी.
घटनास्थळी अपघातग्रस्त वाहने व नागरिकांची गर्दी. (छाया : मिलन मकानदार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : हृदयविकाराचा झटका आल्याने वृद्धास सीपीआर रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेची धडक मोटारीस बसून धक्का बसल्याने आण्णाप्पा शामराव कोळी (वय ८०, रा. वसगडे) हे जागीच मृत झाले. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोंडाओळ परिसरात हा विचित्र अपघात घडला. यामध्ये मोटार व रुग्णवाहिकेतील पाचजण किरकोळ जखमी झाले.

वसगडे (ता. करवीर) येथील शशिकांत श्रीकांत कोळी खासगी रुग्णवाहिकेवर चालक आहे. रविवारी आण्णाप्पा शामराव कोळी यांना हृदयविकाराचा झटका आला. शशिकांत त्यांना घेऊन तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआरकडे निघाला असता, लक्ष्मीपुरी कोंडा ओळ चौकात सिग्नलजवळ थांबलेल्या कारला जोराची धडक बसली. त्यानंतर एका दुचाकीस्वारालाही उडवले. या अपघातामुळे रुग्णवाहिकेतील आण्णाप्पा कोळी यांना जोराचा झटका बसून ते जागीच मृत झाले.

या घटनेत कारमधील अमृता महेश पाटील (वय ४०),मुलगा देव महेश पाटील (१७), ओम प्रकाश पाटील (१९, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले), तर रुग्णवाहिकेतील रोहित सुरेश कोळी (३२), विनोद सुकुमार स्वामी (३२, रा. दोघे वसगडे , ता. करवीर) हे जखमी झाले. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जोराची धडक, कारचे मोठे नुकसान

रुग्णवाहिकेची जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त कुटुंब लग्नाचा जत्था काढण्यासाठी कोल्हापुरात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.