कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी महारपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर तब्बल 2700 विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
या मानवी रांगोळीतून "I Will Vote’ असा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी ‘मी मतदान करणार’ अशी शपथ घेत मतदानाबाबत घोषवाक्य दिले. कार्यक्रमप्रसंगी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमात शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, जय भारत हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर (जाधववाडी), सुसंस्कार हायस्कूल, सुनीतादेवी सोनवणे ज्ञानगंगा हायस्कूल, समता हायस्कूल, माझी शाळा भोसलेवाडी, भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल, सेंट अँथनी स्कूल आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थीही उपस्थित होेते.