Government employees strike | सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा संप तीव्र करण्याचा निर्धार

बैठकीत तोडगा नाही; निवडणूक, जनगणनेचे कामही बंद करणार
कोल्हापूर : संपामुळे आयटीआयमधील सर्व विभाग पूर्णपणे बंद आहेत.
कोल्हापूर : संपामुळे आयटीआयमधील सर्व विभाग पूर्णपणे बंद आहेत.
Published on
Updated on

कोल्हापूर : सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा संप सुरूच राहणार आहे. मागण्यांबाबत झालेल्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघाला नाही. यामुळे हा संप अधिक तीव्र करण्याचा निर्धार राज्य सुकाणू समितीने केल्याचे जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून संप सुरू आहे. राज्याच्या मुख्य सचिवांसमवेत याबाबत बैठक झाली. मागण्यांबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी संघटनांनी मागणी केली. मात्र, गुरुवारी दिवसभरात लेखी आश्वासन मिळाले नाही. यामुळे संपाची तीव्रता वाढवण्याचा निर्धार करत ज्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत, त्यांचे शिक्षक संपात सहभागी होतील. यासह जनगणना, निवडणुकीची कामेही शुक्रवारपासून बंद करण्याबाबत बैठकीत निर्णय घेऊ, असेही सांगितले.

आयटीआयमध्ये शुकशुकाट

कळंबा रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) संपामुळे पूर्णपणे शुकशुकाट आहे. सर्व कामकाज बंद असल्याने विद्यार्थ्यांनी एरव्ही गजबजलेल्या या परिसरात शांतता आहे. जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अनिल कांबळे, संघटक यू. एस. पाटील, आयटीआय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष वैभव पिसे, सचिव सतीश माने आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपात सामील झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news