

कोल्हापूर : भविष्यातील वेगाने बदलणारे जग कृत्रिम बुद्धिमत्तेवर (अख) आधारित असणार आहे. या नव्या युगात स्वतःला अपडेट ठेवून यशस्वी वाटचाल करण्यासाठी एक सुवर्णसंधी दै. ‘पुढारी’ आणि ‘अ कन्सल्टन्सी’ यांनी उपलब्ध करून दिली आहे. पुणे येथील कार्यशाळांच्या प्रचंड यशानंतर, आता कोल्हापूर, सांगली, कराड आणि सातारा येथे ‘बेसिक्स ऑफ ए. आय. अँड ए. आय. टूल्स’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत ए.आय. तंत्रज्ञानाची क्लिष्ट माहिती सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत दिली जाणार आहे. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी, फ्रीलान्सर अशा कोणत्याही वयोगटातील आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची व्यक्ती यात सहभागी होऊ शकते.
ए.आय. आणि चॅट जीपीटीचा दैनंदिन जीवनात आणि व्यवसायात प्रभावी वापर कसा करावा, यावर भर दिला जाईल. सहभागींना प्रेझेंटेशन, वेबसाईट, व्हिडीओ निर्मिती, सोशल मीडिया पोस्ट, लोगो डिझाईन आणि कन्टेन्ट रायटिंगसाठी उपयुक्त ठरणार्या 20 हून अधिक ए.आय. टूल्सचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण मिळेल.
या कार्यशाळेत ए.आय. आणि मार्केटिंग सल्लागार डॉ. अमेय पांगारकर व प्रॉम्प्ट इंजिनिअर प्रसाद कुलकर्णी हे मार्गदर्शन करतील. सोबतच, ए.आय. तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर भविष्यातील करिअर संधींवर, तर मानसशास्त्रज्ञ डॉ. मधुरा केळकर या तंत्रज्ञानाच्या मानसिक पैलूंवर प्रकाश टाकतील.
ही कार्यशाळा सशुल्क असून त्यासाठी 2500 इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी जागा मर्यादित असून ग्रुप बुकिंगवर विशेष सवलत देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. सहभागींना ‘ए.आय.च्या बटव्यातून’ आणि ‘इंडस्ट्री 4.0’ ही बेस्टसेलर पुस्तके, दुपारचे जेवण, चहा-नाश्ता आणि सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तन्वी आंबेरकर : 7758945324
रोहित जोशी : 9834433274
कोल्हापूर : दिनांक : 18 जुलै 2025
स्थळ : स्वामी विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क
सांगली : दिनांक : 19 जुलै 2025
स्थळ : गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स
कराड : दिनांक : 20 जुलै 2025
स्थळ : लिगाडे पाटील ज्युनिअर कॉलेज, विद्यानगर
सातारा : दिनांक : 21 जुलै 2025
स्थळ : कला व वाणिज्य महाविद्यालय, शुक्रवार पेठ