Ambabai Temple | अंबाबाई मंदिराच्या शिखरावर चढवला सोन्याचा कळस

मंत्रोच्चारात आज होणार पूजन
Ambabai Temple |
Ambabai Temple | अंबाबाई मंदिराच्या शिखरावर चढवला सोन्याचा कळस
Published on
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सुमारे अडीच कोटी रुपये मूल्याचा आणि दीड किलो सोन्याचा कळस गुरुवारी रात्री विधिवत बसविण्यात आला. अधिक मासातील दानाला असलेले धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हे काम करण्यात आले असून, शुक्रवारी वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमध्ये कळसाचे पूजन करण्यात येणार आहे.

शिखराचे संरक्षण करण्यासाठी तांब्याचे संरक्षक आवरण बसविण्याची संकल्पना पुढे आली. त्याचवेळी गोव्यातील एका भाविकाने सोन्याचा कळस दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने या उपक्रमाला नवे स्वरूप मिळाले. सहा फूट उंचीच्या मूळ शिखराचा अभ्यास करून मंगलोर येथील कुशल कारागिरांकडून कळस तयार करण्यात आला. कळसारोहणाचे काम गुरुवारी रात्री ८ वाजता सुरू करण्यात आले. मंदिराच्या मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता शिखरावर कळस बसविल्याने मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली.

क्रेनच्या सहाय्याने कळस शिखरावर विराजमान

कळस प्रथम मंदिराच्या छतावर नेण्यात आला व क्रेनच्या सहाय्याने तो शिखरापर्यंत उचलून बसविण्यात आला. कळस नाजूक असल्याने कोणताही धक्का बसू नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर खबरदारी घेतली. यासाठी सुमारे ४० कर्मचारी कार्यरत होते. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी रात्रभर घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news