

कोल्हापूर : सोने आणि चांदीच्या दराने शुक्रवारी पुन्हा विक्रम केला आहे. अमेरिकेने लागू केलेल्या 50 टक्के टॅरिफच्या अंमलबजावणीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी नवा विक्रम केला.
गुरुवारी (दि. 28 ऑगस्ट) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा (जीएसटीसह) 1,04,500 रुपये आणि चांदी प्रतिकिलो 1,21,200 रुपये होता. मात्र, शुक्रवारी (दि. 29 ऑगस्ट) सोन्याने एका दिवसात 1,300 रुपये वाढून 1,05,800 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीने 1,21,600 रुपये प्रतिकिलोचा टप्पा गाठला.
सराफ बाजार तज्ज्ञांच्या मते, विक्रमी दरवाढीमागे 27 ऑगस्टपासून अमेरिकेने वाढवलेले टॅरिफ हे मुख्य कारण आहे. टॅरिफवॉरमुळे शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीतून पैसा सोने-चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तेत वळत आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या बदललेल्या गणितामुळे दरांनी ही विक्रमी उसळी घेतली आहे.
जीएसटीशिवाय आजचे दर सोने : 1,02,720 रुपये 10 ग्रॅम. चांदी : 1,18,060 रुपये किलो