Gold-Silver prices | सोने-चांदीच्या दरांची पुन्हा विक्रमी उसळी

gold-silver-prices-hit-record-high-again
Gold-Silver prices | सोने-चांदीच्या दरांची पुन्हा विक्रमी उसळीPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी झालेला सोने चांदी दराचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढत मौल्यवान धातुंच्या दराने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला. अमेरिकेने लागू केलेल्या टॅरिफच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी केलेल्या खरेदीमुळे सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी आतापर्यंतचा सर्वोच्च उच्चांक नोंदवला. गुरुवारी (दि.28) जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 1,लाख 4,500 रुपयांवर पोहोचला, तर चांदीने किलोमागे 1 लाख 21,200 रुपयांचा आकडा गाठला. 25 ऑगस्ट रोजी सोन्याने 1 लाख 3,400 आणि चांदीने 1 लाख19,700 चा विक्रम केला होता. मात्र, केवळ तीन दिवसांच्या अंतराने त्यात मोठी भर पडली आहे.

टॅरिफ अंमलबजावणीचा परिणाम

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीमागे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमध्ये 27 ऑगस्टपासून झालेली वाढ हे प्रमुख कारण आहे. या मटॅरिफवॉरफमुळे, शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीतून पैसा काढून तो सोने-चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवण्याकडे गुंतवणूकदारांचा कलआहे. मागणी आणि पुरवठ्याच्या या बदललेल्या गणितामुळे दरांनी ही विक्रमी उसळी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news