

कोल्हापूर : सोन्या-चांदीच्या दरवाढीचा धडाका उच्चांकी पातळीनंतर दुसर्या दिवशीदेखील कायम राहिला. बुधवारी पुन्हा 200 रुपयांची वाढ झाल्याने 24 कॅरेट सोन्याने जीएसटीसह प्रतितोळा 1 लाख 3 हजार 200 रुपयांचा, तर चांदीने प्रतिकिलो 1 लाख 19 हजार 200 रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. या दरवाढीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, गुंतवणूकदारांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, भू-राजकीय तणाव आणि प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सुरक्षित गुंतवणूक म्हणून होणारी सोन्याची खरेदी ही दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्याचबरोबर चांदीच्या बाबतीत औद्योगिक मागणीचा स्फोट झाला आहे. विशेषतः सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहने ( एती) आणि 5 ॠ तंत्रज्ञानामध्ये चांदीचा वापर वाढल्याने मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.