

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेतील घडामोडीचा फटका सराफ बाजाराला बसत आहे. सोने व चांदी दरात पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी (दि. 10) 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 94 हजार इतका झाला तर चांदीचा दर एक किलोसाठी 95 हजार रुपयांवर पोहोचला.
सोने दरवाढीचा ट्रेंड पुन्हा सुरू झाल्याने सोने दराची घसरण सुरू राहणार असल्याचे अंदाज फोल ठरले आहेत. बुधवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे एक हजार 400 रुपयांची तसेच चांदी दरात किलोमागे एक हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याचा दर 92 हजार 6000 रुपये तर चांदीचा दर 93800 रुपये प्रति किलो होता.
आजचे दर (GST वगळून रुपयांत) : कोल्हापूर सराफ बाजार
24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) : 91,260
चांदी (1 किलो) : 92,230