

कोल्हापूर ः सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीमध्ये शुक्रवारी (दि. 18) पुन्हा दहा ग्रॅममागे 600 रुपयांची वाढ झाली. कोल्हापूर सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर 98 हजार 200 रुपये झाला आहे. गुरुवारी (दि. 17) सोन्याचा दर दहा ग्रॅमला 97 हजार 600 रुपये होता. चांदीचा जीएसटीसह किलोमागे दर गुरुवारच्या तुलनेत 200 रुपयाने कमी होऊन 98 हजार 400 रुपये झाला. सोन्याचा दहा ग्रॅमचा दर एक लाखांपासून केवळ 1 हजार 800 रुपये दूर राहिला आहे. 1 जानेवारी 2025 पासून सोन्याच्या दरात तब्बल 19 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे.
सोने : 95,340 (प्रति दहा ग्रॅम)
चांदी ः 95,530 (प्रति किलो)