

कोल्हापूर : सोन्याच्या दरात गुरुवारी (दि. 24) पुन्हा 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली. यामुळे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह 99 हजार 100 रुपये असा झाला. तीन दिवसांपूर्वी सोन्याच्या दराने 1 लाख 1 हजार 100 रुपये हा दराचा उच्चांक केला होता.
अक्षय तृतीया हा सोने खरेदीचा मोठा मुहूर्त असतो. सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असताना सोने पुन्हा उच्चांकी पातळीच्या जवळपास पोहोचले आहे. चांदी दरातही 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. 1 किलो चांदीचा जीएसटीसह दर 1 लाख 8 हजार रुपये झाला आहे.
जीएसटीशिवाय दर असे : सोने - 96 हजार 210 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी - 97 हजार 860 रुपये (प्रति एक किलो).