Gold-silver rates| सोने 8 हजार 800, चांदी दरात 7 हजार रुपयांची घसरण

नववर्षाच्या मुहूर्तावर सुखद धक्का
Gold and Silver Price Update
Gold and Silver Price UpdatePudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोने आणि चांदीचे दर एकाच दिवसात लक्षणीयरीत्या खाली आले. बुधवारी (दि. 18) 1 लाख 57 हजार 300 रुपयांवर असलेले 24 कॅरेट 10 ग््रॉम सोन्याचे दर गुरुवारी (दि. 19) थेट 1 लाख 48 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आले. म्हणजेच केवळ 24 तासांत सोन्यात तब्बल 8 हजार 800 रुपयांची घट झाली.

1 किलो चांदीचा दर 2 लाख 52 हजार रुपयांवरून 2 लाख 45 हजार रुपयांवर आला. हे दर जीएसटीसह असून, जीएसटी वजा केल्यास मूळचे दर यापेक्षा 3 टक्क्यांनी कमी आहेत. जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यापासून बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news