

कोल्हापूर : सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली वाढीची चढती कमान कायम आहे. सोमवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी नवा उच्चांक प्रस्थापित केला. सोने 1 लाख 20 हजारांच्या जवळ, तर चांदी दीड लाखाजवळ पोहोचली आहे. हे टप्पे दसर्यानिमित्त ओलांडल्यास सोने दराचे नवे सीमोल्लंघन होणार आहे.
सोमवारी (दि. 29) 1,300 रुपयांनी वाढून, 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर आता 1 लाख 19,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. रविवारी (दि. 28) तो 1 लाख 17,700 रुपये होता. तर, चांदीचा जीएसटीसह दर आता 1,47,800 रुपये प्रतिकिलो या नव्या विक्रमी टप्प्यावर पोहोचला आहे. रविवारी तो 1 लाख 45,800 रुपये प्रतिकिलो होता. त्यात एक दिवसात आणखी 2,000 रुपयांची वाढ झाली आहे.