kolhapur News : ‘गोकुळ‌’ची व्याज वसुलीसाठी वाहतूक संस्थांना नोटीस

पशुखाद्य वाहतूक अपहार प्रकरण
Gokul dairy news
Gokul dairy news | ‘गोकुळ’चा 20 लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांकPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ पशुखाद्य वाहतूक संस्थांकडून अपहाराच्या रकमेवरील 14 लाख रुपये व्याजही वसूल करणार आहे. अपहारप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी आकारलेल्या या व्याजाची रक्कम भरण्याबाबत गोकुळने संबंधित सहा वाहतूक संस्थांना नोटीस बजावली आहे. जाजम व घड्याळ खरेदी संघाच्या पोटनियमानुसारच झाली असल्याचे चौकशी अधिकारी सदाशिव गोसावी यांनी दुग्ध विभागाकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

गोकुळमध्ये 2024-25 च्या आर्थिक वर्षात पशुखाद्य वाहतुकीत अपहार झाला होता. पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल व महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथून पशुखाद्याची वाहतूक करण्याचा ठेका वाहतूक संस्थांकडे आहे. कारखाना ते संस्थांपर्यंतच्या वाहतुकीच्या अंतरावर संस्थांना भाडे दिले जाते; पण सहा वाहतूक संस्थांनी जादा अंतर दाखवून अपहार केला आहे. अपहाराची रक्कम 79 लाख रुपये आहे. या रकमेवरील 14 लाख 13 हजार 885 रुपये व्याज वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news