Gokul Election : गोकुळ दूध संघासाठी ऑक्‍टोबरमध्‍ये मतदान?

कोल्‍हापूर सर्किट बेंचच्‍या आदेशानंतर ९० दिवसांची मागणार मुदतवाढ
Gokul Election |
Gokul Election |
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळ निवडणूक प्रक्रियेसाठी विभागीय उपनिबंधक तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी देवीदास मिसाळ ९० दिवसांची मुदतवाढ मागणार आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीवर हरकती मागवणे, त्‍यावर सुनावणी घेणे यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागेल. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्‍यानंतर उमेदवारी अर्ज मागविण्यापासून मतमोजणीपर्यंतच्या कार्यक्रमासाठी ४५ दिवस लागतील. त्यानुसार गोकुळसाठी ऑक्टोबरमध्ये मतदान होण्‍याची शक्‍यता आहे.

गोकुळची निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरू झाली. सहायक निबंधक यांनी गोकुळकडे संस्था सभासदांची यादी मागितली. ५,४७० संस्था सभासदांची यादी सादर केली; मात्र वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी १,३२० दूध संस्थांवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. याबाबतची सुनावणी सुरू असतानाच पुंगाव (ता. राधानगरी) येथील स्वामी समर्थ दूध संस्थेने गोकुळवर नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

निवडणूक प्रक्रियेला गती येणार का, याकडे लक्ष

सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रशासक मंडळाची नियुक्ती रद्द करता येणार नाही, असा निर्णय देत ९० दिवसांत निवडणूक पूर्ण करण्याचा आदेश दिला. अवसायनातील संस्थांची सुनावणी जूनच्या मध्यंतरास पूर्ण झाली. यानंतर संस्थांकडून ठराव मागवून त्यामधील दुबार ठरावांची सुनावणी घेत ५,४३९ संस्थांची प्रारूप मतदार यादी २२ जुलैला विभागीय उपनिबंधक यांच्याकडे सादर झाली; मात्र अद्याप यादी प्रसिद्ध झालेली नाही. दरम्‍यान, गोकुळ निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचने बुधवारी शासन व दुग्ध विभागाला तत्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला गती येणार का, याकडे लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news