Gokul Milk Union : प्रशासकीय मंडळ अध्यक्षांनी घेतला विविध कामकाजांचा आढावा

‌‘गोकुळ‌’च्या ताराबाई पार्क विकास कक्षाला भेट
Gokul Milk
कोल्हापूर : गोकुळच्या ताराबाई पार्क विकास कक्षाला भेट दिल्यानंतर प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांचा सत्कार करताना कार्यकारी संचालक योगेश गोडबोले. यावेळी सदस्य सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर, अन्य अधिकारी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर ः गोकुळच्या ताराबाई पार्क येथील विकास कक्षाला प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांनी सदस्य सागर बलकवडे आणि चंद्रकांत परुळेकर यांच्यासह भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मंडळाने संकलन विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्रशिक्षण केंद्र तसेच रोग निदान प्रयोगशाळा आदी विभागांना भेट देत तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. विविध विभागांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रशिक्षण कार्य आणि प्रयोगशाळेतील सुविधा यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. तसेच दूध उत्पादक शेतकरी, संलग्न संस्था आणि ग््रााहकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा व दैनंदिन कामकाजाचा आढावाही घेण्यात आला.

भेटीदरम्यान ताराबाई पार्क कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विभागप्रमुखांनी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली.

संजयकुमार सुद्रीक म्हणाले, गोकुळ दूध संघ हा सहकार क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि नामांकित दूध संघ आहे. संस्थेची आजवरची प्रगती आणि विश्वासाची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. संस्थेच्या प्रगतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. कर्मचाऱ्यांची संस्थेबद्दलची निष्ठा, आत्मीयता आणि कामाप्रतिची बांधिलकी हेच गोकुळच्या यशामागील खरे बळ आहे. यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डॉ. प्रकाश साळुंके, डॉ. प्रकाश दळवी, धनाजी पाटील, अशोक पुणेकर, सचिन पाटील यांच्यासह अधिकारी, विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news