Gokul Election : ४९२ दूध संस्‍थांच्‍या मतदान अधिकाराचा मार्ग मोकळा

दत्त दूध संस्‍थेचा यादीत समावेशाचा सर्किट बेंचचा आदेश; दुबार ठराव, अवसायनातील संस्‍थांना दिलासा
Gokul Election |
Gokul Election |
Published on
Updated on

कोल्‍हापूर : खामकरवाडी (ता. राधानगरी) येथील दत्त सहकारी दूध संस्‍थेचा मतदार यादीत समावेश करा, असा आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर सर्किट बेंचचे न्‍यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी मंगळवारी दिला.

या आदेशामुळे अवसायनाचा आदेश रद्द केलेल्‍या ४९२ दूध संस्‍थांचाही मतदार यादीतील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अन्‍य संस्‍थाही यादीतील समावेशाबाबत अर्ज करणार असून त्‍यांचाही मतदार यादीत समावेश करावा लागणार आहे. सुनावणीदरम्‍यान न्यायालयाच्या १ जुलै व १२ ऑगस्ट २०२६ च्या अंतिम आदेशाचा अवमान केल्याबद्दल न्यायालयाने शासनास फटकारले.

सर्वोच्‍च न्‍यायालयात जाण्‍याच्‍या हालचाली

दत्त दूध संस्‍थेचा गोकुळच्‍या मतदार यादीत समावेश करण्‍याचा आदेश कोल्‍हापूर सर्किट बेंचने दिला. या निर्णयामुळे अन्‍य संस्‍थाचाही यादीत समावेश करावा लागणार आहे. कोल्‍हापूर सर्किट बेंचने दिलेल्‍या या निर्णया विरोधात काही संस्‍थांकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेण्‍याच्‍या हालचाली सुरु असल्‍याचे समजते.

प्रारूप मतदार यादीवर ९० हरकती

गोकुळच्‍या प्रारूप मतदार यादीवर बुधवारी दिवसभरात सहायक निबंधक कार्यालयात ९० हरकती दाखल झाल्‍या. आजअखेर २६० हरकती आल्‍या आहेत. बुधवारी दाखल झालेल्‍या हरकतींमध्‍ये शाहूवाडीतील दोन व अन्‍य एक अशा तीन संस्‍थांनी ठराव दाखल केलेले नाहीत. या संस्‍थांनी प्रारूप मतदार यादीत समावेश करण्‍याची हरकत नोंदवली आहे. हरकत दाखल करण्‍यासाठी गुरुवारी (दि. २०) अंतिम मुदत असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news