Gokul Election : गोकुळच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीपदी युसुफ शेख व प्रेमचंद राठोड!

Kolhapur Gokul Dudh Sangh Election
Kolhapur Gokul Dudh Sangh ElectionPudhari
Published on
Updated on

गुडाळ : गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसुफ शेख आणि प्रेमचंद राठोड यांची नियुक्ती आज शुक्रवारी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोकराव गाडे यांनी केली.

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीर च्या उपविभागीय अधिकारी श्रीमती मोसमी चौगले या महसूल विभागाच्या आहेत. जिल्ह्यातील एक प्रमुख सहकारी शिखर संस्था असलेल्या गोकुळच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाने शेख आणि राठोड या सहकारातील दोन अधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

युसुफ शेख हे जिल्हा सहकार निबंधक कार्यालयात सहाय्यक निबंधक( प्रशासन )म्हणून तर प्रेमचंद राठोड हे सहाय्यक निबंधक, करवीर म्हणून सध्या काम पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news