Gokul Election| ‘गोकुळ’ मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज: 332 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण पूर्ण!

18 ऑक्टोंबर रोजी 35 केंद्रावर होणार मतदान,
Gokul Election | ‘गोकुळ’ मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज: 332 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण पूर्ण!
‘गोकुळ’ मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज: 332 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण पूर्ण!
Published on: 
Updated on: 

गुडाळ:- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ तथा गोकुळच्या 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून तालुकावार होणाऱ्या या मतदानासाठी 35 केंद्रावर 332 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा साहेब निबंध (प्रशासन )युसूफ शेख यांनी दिली.

दरम्यान, या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज रमण मळ्यातील बहुउद्देशीय हॉलला संपन्न झाले. यामध्ये 280 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. बारा तालुक्यात 35 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, सहा मतदान अधिकारी आणि एक शिपाई तैनात करण्यात येणार आहेत. महसूल, सहकार आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सहकार विभागाच्या बारा सहाय्यक निबंधकांची झोनल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक झोनल ऑफिसर कडे एका तालुक्यातील मतदान केंद्रांचा कार्यभार सोपवला जाईल.

18 ऑक्टोबरला मतदान संपल्यानंतर मतपेट्या स्वतंत्र वाहनातून पोलीस बंदोबस्तात तालुक्याच्या ठिकाणावरून रमणमळ्यातील निवडणूक कार्यालयात आणल्या जातील. या ठिकाणी तयार केलेल्या स्ट्रॉंग मध्ये पोलीस बंदोबस्तात मतपेट्या ठेवण्यात येतील. सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी मतमोजणी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news