
कोल्हापूर सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि विधानसभा निवडणुकीवर देखील प्रभाव टाकरणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. यंदाची निवडणूक विशेष करून जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते विरूद्ध सतेज पाटील अशी झाली. आज जिल्ह्यातील ठरावधारक कोणाच्या बाजूने मतदान करणार याचा निकाल लागणार आहे. २५ संचालकांपैकी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी अन् राजर्षी शाहू समविचारी आघाडी यांच्या किती सीट बसतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीसाठी ९९.९६ टक्के मतदान झाले आहे. प्रचारावेळी विविध देवांचा आंगारा अन् शपथा यांचा देखील सहारा घेण्यात आला होता. त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागले आहे.