Gokul Election : हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांना दिलासा; भाजपसाठी धोक्‍याची घंटा

गोकुळच्‍या मतदार यादीतील ४९२ संस्‍थांच्‍या समावेशाने वाढली ताकद
Kolhapur Circuit Bench
कोल्हापूर सर्किट बेंच
Published on
Updated on

धीरज बरगे

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर सर्किट बेंचने खामकरवाडीच्‍या दत्त दूध संस्‍थेचा गोकुळच्‍या मतदार यादीत समावेश करण्‍याचा आदेश दिला. न्‍यायालयाच्‍या या आदेशाने अवसायनाचा आदेश रद्द झालेल्‍या ४९२ दूध संस्‍थांचा यादीतील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे दूध संस्‍थांच्‍या सहा महिन्‍यांच्‍या संघर्षाला यश मिळाले असून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे, तर संस्‍थांचा समावेश भाजपसाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे. न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर गोकुळ निवडणुकीचे चित्र बदलले आहे.

तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेतलेल्‍या १,३२० दूध संस्‍थांपैकी ६४४ दूध संस्‍थांचा सहा‍यक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांनी अवसायनाचा आदेश अंतिम केला. ६४४ पैकी १९४ संस्‍थांनी ठाकरे यांच्‍या निर्णया विरोधात सर्किट बेंचमध्‍ये तर २९८ संस्‍थांनी विभागीय उपनिबंधकांकडे अपील केले होते. दोन्‍हीकडे झालेल्‍या सुनावणीमध्‍ये अवसायनाचा अंतिम आदेश रद्द करण्‍यात आल्‍याने संस्‍थांना दिलासा मिळाला.

गोकुळची यादी होणार ५,३८९ मतदारांची

दुग्‍ध विभागाने गोकुळची ४,८९७ मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्‍यामध्‍ये आता आणखी ४९२ संस्‍था वाढणार आहेत. त्‍यामुळे गोकुळची मतदार यादी आता ५,३८९ मतदारांची होणार आहे. हरकती, त्‍यावरील सुनावणीनंतर ४ सप्‍टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news