Gokul election process | ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रियेस पुन्हा होणार सुरुवात

Gokul dairy news
Gokul election process | ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रियेस पुन्हा होणार सुरुवातPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’च्या थांबलेल्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारपासून (दि. 6) सुरुवात होण्याची शक्यता आहे. सहायक निबंधक दुग्ध कार्यालयाकडून संस्था सभासदांना ठरावाची प्रत पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

‘गोकुळ’ संचालक मंडळाची मुदत मे 2026 मध्ये संपत असल्याने दुग्ध विभागाकडून ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, 1,200 दूध संस्थांच्या अवसायन कारवाईचा मुद्दा न्यायालयात गेल्याने निवडणूक प्रक्रिया थांबली होती. दरम्यान, 1,200 दूध संस्थांबाबात दुग्ध विभागाने निर्णय घेण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर विभागीय निबंधक दुग्ध यांनी ‘गोकुळ’ मतदारयादीचा कार्यक्रम सादर करण्याचे पत्र सहायक निबंधक यांना दिले होते. गुरुवारी सहायक निबंधक यांनी विभागीय निबंधक यांना संस्था सभासदांकडून ठराव मागविण्यास मंजुरी मिळण्याबाबत पत्र दिले होते. या पत्राला विभागीय निबंधक यांनी मंजुरी दिल्याचे समजते. त्यानुसार सोमवारपासून ठराव मागविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

तामगाव येथील सद्गुरू दूध संस्थेने 1,200 दूध संस्थांबाबत पात्र -अपात्रतेचा निर्णय घ्या; मगच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करा, अशी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. याचिकेवर गुरुवारी (दि. 2) सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी (दि. 6) ठेवली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत न्यायालय काय निर्णय देणार, हे महत्त्वाचे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news