Gokul Election | ‘गोकुळ’चे निवडणूक कार्यालय रमणमळ्यात

Kolhapur Gokul Election |
Gokul Election | ‘गोकुळ’चे निवडणूक कार्यालय रमणमळ्यात File photo
Published on
Updated on

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघा (गोकुळ) चे निवडणूक कार्यालय रमणमळा येथे केले आहे. येथील बहुउद्देशीय हॉल येथे निवडणुकीची प्रक्रिया चालेल. मंगळवार (दि. १५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यास सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिली.

‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन ४ सप्‍टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. यानंतर सोमवारी (दि. ७) निवडणूक निर्णय अधिकारी म्‍हणून उपविभागीय अधिकारी, करवीर मौसमी चौगुले यांची नियुक्‍ती झाली. बुधवारी चौगुले यांनी बहुउद्देशीय हॉल येथे ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया चालणार असल्‍याचे सांगितले. १५ ते २२ सप्‍टेंबरदरम्‍यान उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची मुदत असेल. २३ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २४ रोजी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर ८ ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्‍यासाठी मुदत राहील. ९ ऑक्‍टोबरला उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्‍हवाटप होईल. १८ ऑक्‍टोबरला मतदान आणि १९ ऑक्‍टोबरला मतमोजणी होईल, असे चौगुले यांनी सांगितले.

शेख, राठोड सहायक अधिकारी?

‘गोकुळ’ निवडणुकीसाठी सहायक निवडणूक अधिकारी म्‍हणून जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक यसुफ शेख आणि करवीरचे सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांची नियुक्‍ती होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यांच्‍या नावाचा प्रस्‍ताव राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्‍यात आल्‍याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news