Gokul election |'गोकुळ'च्या रणांगणात नात्या-गोत्यातच लढाई! तब्बल 20 उमेदवार एकमेकांचे नातेवाईक!

Gokul dairy election relatives- 'गोकुळ'च्या रणांगणात नात्या-गोत्यातच लढाई! तब्बल 20 उमेदवार एकमेकांचे नातेवाईक!
Gokul election |
Gokul election |
Published on: 
Updated on: 

गुडाळ (राधानगरी) : आशिष ल. पाटील

गोकुळच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारावर नजर टाकली असता एकूण तब्बल वीस उमेदवार एकमेकांच्या जवळचे नातेवाईक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोकुळची लढाई ही नात्यागोत्यातच होत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. विशेष म्हणजे महायुती पॅनलमधील 15 उमेदवार हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत.

Gokul election |
Gokul Election | महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी-भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल

18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत 25 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात आहेत. दोन आघाड्यांमध्ये थेट दुरंगी लढत होत आहे. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी 8 ऑक्टोबरला अखेरच्या क्षणी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा झाली.

Gokul election |
Gokul Election : ‘गोकुळ’च्या रणांगणात नात्यागोत्यातच लढाई!

आ. सतेज पाटील यांनी चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले शशिकांत पाटील चुयेकर आणि महायुतीच्या पॅनमधून विरोधात लढणारे प्रताप पाटील-कावणेकर हे नात्याने सख्खे मेहुणे-पाहुणे आहेत. महायुतीकडून लढत असलेले माजी आमदार राजेश पाटील यांचे सख्खे भाचे वीरेंद्र मंडलिक त्यांच्याच पॅनलचे उमेदवार असले तरी मामेभाऊ विशाल गोपाळराव पाटील हे विरोधातील आ. सतेज पाटील यांच्या आघाडीचे उमेदवार आहेत.

गोकुळचे माजी चेअरमन अरुणकुमार डोंगळे हे महायुतीमधून तर त्यांच्या सुन आणि पुतणे धीरज डोंगळे यांच्या पत्नी सौ भाग्यश्री डोंगळे या आ. सतेज पाटील यांच्या आघाडीतून लढत आहेत.

जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे महायुती पॅनलेकडून तर त्यांचे चुलत बंधू गोकुळचे माजी संचालक उदय पाटील हे आ. सतेज पाटील यांच्या आघाडीतून लढत आहेत. तर या पाटील बंधूंचे भाऊजी असलेले अमर पाटील-कोडोलीकर महायुतीमधून लढत आहेत. माजी संचालक अमरीश घाटगे महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांचे चुलत सासरे विश्वासराव इंगवले, आ. पाटील आघाडीचे उमेदवार आहेत. तर घाटगे यांच्या नात्याने भगिनी असलेल्या सौ. शौमिका महाडिक या महायुतीच्या उमेदवार आहेत.

गोकुळचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील आणि त्यांचे व्याही माजी संचालक युवराजबापू पाटील हे महायुती पॅनलमध्ये एकत्र आहेत. केडीसीसीचे संचालक रणजीत पाटील आणि त्यांच्या आत्या केडीसीसीच्या माजी संचालिका सौ. अर्चना ए. वाय. पाटील महायुती पॅनलमधून एकत्र लढत आहेत. माजी संचालक चेतन नरके आणि अजित नरके हे चुलत बंधू महायुती पॅनलमधून लढत आहेत.

महायुती पॅनलमधील 15 उमेदवार एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आ. सतेज पाटील यांच्या आघाडीचे पाच उमेदवार महायुती पॅनलच्या उमेदवारांच्या नातेसंबंधातील आहेत. एकंदरीत गोकुळच्या रणांगणावर होणारी निवडणूक नात्यागोत्यातच होत असल्याने निकालानंतर 'कही खुशी कही गम' असे वातावरण राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news