Gokul Election | सर्वसाधारण गटाच्‍या २० जागांसाठी १४६ अर्ज वैध

‘गोकुळ’साठी अर्ज वैध ठरलेल्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध
Gokul Election |
Gokul Election | सर्वसाधारण गटाच्‍या २० जागांसाठी १४६ अर्ज वैध
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीत सर्वसाधारण गटातील २० जागांसाठी तब्‍बल १४६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या गटातून गोकुळच्‍या २१ माजी संचालकांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्‍यामुळे सर्वसाधारण गटातील उमेदवार निश्‍चित करताना विशेषत: महायुतीच्‍या नेत्‍यांचा मोठा कस लागणार आहे.

रमणमळा येथील बहुउद्दे्‍ेशीय हॉल येथे गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. छाननीनंतर गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अर्ज वैध ठरलेल्‍या २४० उमेदवारांची यादी प्रसिधद्ध केली.

माजी संचालकांचे अर्ज वैध

गोकुळच्‍या मागील संचालक मंडळातील सर्व माजी संचालकांचे अर्ज वैध ठरले आहेत. केवळ मुरलीधर जाधव यांचा सर्वसाधारण गटातील अर्ज अवैध ठरला आहे. मात्र त्‍यांचा इतर मागास गटातील अर्ज वैध ठरला आहे.

महिला गटात नेत्‍यांच्‍या पत्‍नी, स्‍नुषा

महिला राखीव गटात ३४ अर्ज वैध ठरले आहेत. यामध्‍ये माजी संचालिका शौमिका महाडिक, अंजना रेडेकर यांच्‍यासह बहुतांश अर्ज हे नेते, माजी संचालक, प्रमुख कार्यकर्ते यांची पत्‍नी, स्‍नुषा यांचे आहेत.

भटके विमुक्‍तमध्‍ये १४ अर्ज

भटके विमुक्‍तच्‍या एका जागेसाठी १४ अर्ज वैध ठरले आहेत. यामध्‍ये माजी संचालक बयाजी शेळके, विश्‍वास जाधव यांच्‍यासह जिल्‍हा बँकेच्‍या संचालिका स्‍मिता गवळी त्‍यांचे पती युवराज गवळी, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर यांचे प्रमुख अर्ज आहेत.

तीन आजी-माजी आमदार एकाच गटात

अनुसूचित जाती गटात केवळ ९ अर्ज असून यामध्‍ये तीन आजी-माजी आमदारांच्‍या अर्जाचा समावेश आहे. जनसुराज्‍यचे आ. अशोकराव माने, काँग्रेसचे माजी आ. जिल्‍हा बँकेचे उपाध्‍यक्ष राजू आवळे, शिवसेना शिंदे गटाचे माजी आ. गोकुळचे माजी संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांचे अर्ज आहेत. त्‍यामुळे या गटातही उमेदवारीवरून रस्‍सीखेच असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news