Gokul Election | गोकुळ निवडणूक : दुसर्‍या दिवशी १२ उमेदवारांचे अर्ज; विश्वासराव पाटील कुटुंबीयांकडून सहा अर्ज

गुरुवारी राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य पक्षांसह राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शक्तिप्रदर्शनाची शक्यता
Gokul Dudh Sangh Election Nomination Forms
Gokul Dudh Sangh Election Nomination FormsPudhari
Published on
Updated on

Gokul Dudh Sangh Election Nomination Forms

आशिष पाटील

गुडाळ : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय आणि महिला राखीव गटातून एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या तीनही गटांतून संघाचे माजी चेअरमन विश्वासराव पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहा अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, विमुक्त भटक्या जाती आणि अनुसूचित जाती या दोन गटांत अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.

उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसर्‍या दिवशी १३० अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत विक्री झालेल्या उमेदवारी अर्जांची एकूण संख्या ६०० वर पोहोचली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर असल्याने आगामी दिवसांत मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Gokul Dudh Sangh Election Nomination Forms
Gokul Election | गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना दिलासा; अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सर्वसाधारण गटातून सहा अर्ज

सर्वसाधारण गटातून माजी चेअरमन विश्वासराव पाटील, त्यांचे सुपुत्र सचिन पाटील आणि स्नुषा पल्लवी सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केले. याशिवाय हंबीरराव वळके (निगवे दुमाला), विकास पाटील (गोगवे) आणि सुरेश देसाई (म्हसवे) यांनीही उमेदवारी अर्ज भरले.

इतर मागासवर्गीय गटात तिघांचे अर्ज

इतर मागासवर्गीय गटातून विश्वासराव पाटील आणि सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केले. तसेच अ‍ॅड. सुरेशराव कुराडे यांनीही या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Gokul Dudh Sangh Election Nomination Forms
Gokul Election 2026 : पात्र 492 संस्था पुन्हा अपात्र करण्याबाबत याचिका; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष

महिला राखीव गटातून तीन अर्ज

महिला राखीव गटातून पल्लवी सचिन पाटील (माळ्याची शिरोली), रेखा सुरेश कुराडे (ऐनापूर) आणि वंदना आदिनाथ भावके (वाडीचरण) यांनी अर्ज दाखल केले.

गुरुवारी सामुदायिक अर्ज दाखल होणार

गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या वतीने सामुदायिकरीत्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. तसेच आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीनेही गुरुवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news