Gokul dudh | गोकुळवर शासकीय प्रशासक मंडळ?

तीन सदस्यीय मंडळ येण्याची शक्यता; भाजपकडून वरिष्ठ पातळीवर हालचाली
Gokul dudh |
Gokul dudh | गोकुळवर शासकीय प्रशासक मंडळ?
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळवर शासकीय प्रशासक मंडळ येण्याची दाट शक्यता आहे. हे मंडण तीन सदस्यीय असणार असल्याची माहिती मिळते आहे. तसे प्रयत्नही भाजापकडून वरीष्ठ पातळीवर सुरु आहेत. तर गोकुळमधील सत्ताधारी आघाडीमधील महायुतीच्या नेत्यांकडून प्रशासक नियुक्ती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

गोकुळ संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपणार आहे. सहकार कायद्यात केलेल्या बदलानुसार अ वर्ग सहकारी संस्थेची मुदत संपल्यानंतर संबंधित संस्थेच्या संचालक मंडळाला मुदत वाढ देता येणार नाही. त्यावर प्रशासकच नियुक्त केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील बैठकीत संचालकांना हे सांगितले. त्यामुळे गोकुळवर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते.

प्रशासक नियुक्ती थांबविण्यासाठीही प्रयत्न

संचालक मंडळाची मुदत संपुष्टात येत असल्याने गोकुळच्या इतिहासात प्रथमच प्रशासक येण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्याने यापुर्वी गोकुळवर कधीच प्रशासक आला नाही. त्यामुळे गोकुळच्या सत्ताधारी आघाडीकडून प्रशासक नियुक्ती थांबविण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

सत्ताधारी आघाडीचे मंत्री, आमदार, संचालक यांनी प्रशासक नको अशी आग्रही भुमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदेशीर बाबी तपासून निर्यण घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्ती होणार का नाही अशीही हुरहुरही कायम आहे.

तीन सदस्यीय प्रशासक मंडळाची चर्चा

गोकुळवर तीन सदस्यीय प्रशासक मंडळ येणार असल्याची चर्चा आहे. तशा हालचालीही वरीष्ठ पातळीवर सुरु आहेत. तीन सदस्यीय मंडळामध्ये तीनही सदस्य हे शासकीय अधिकारी असू शकतात. अथवा मंडळाचा अध्यक्ष शासकीय अधिकारी आणि दोन सदस्य हे गोकुळमधील कामकाजाचा अनुभव असणारे सेवानिवृत्त अधिकारी यांचा समावेश असलेले प्रशासक मंडळ असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news