Gokul Dairy : गोकुळच्या चेअरमनसह दोन ज्येष्ठ संचालकांची होणार ईडी चौकशी?

आ. शिवाजी पाटील यांच्याकडे भष्टाचाराची कागदपत्रे
Gokul Dairy
गोकुळ दूध संघPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह चेअरमन व दोन ज्येष्ठ संचालकांनी केलेल्या भष्टाचाराची कागदपत्रे संकलित केली आहेत. शंभरहून अधिक पुरावे असलेली ही कागदपत्रे सोमवारी (दि. 20) मुबंईमध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे सादर करणार आहे. याप्रकरणात त्यांची ईडी चौकशी होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले.

गोकुळचा पैसा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे, असे सांगणाऱ्यांनी गोकुळमध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार केला आहे. सीमाभागातील दूध किती रुपयांना खरेदी केले, त्याचे गोकुळमधून किती रुपये घेतले जातात यासह इतर अनेक प्रकरणांत अपहार झाल्याचे निदर्शनास येत आहे. ही सर्व कागदपत्रे सोमय्या यांच्याकडे देऊन मंत्री मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन, दोन ज्येष्ठ संचालक यांची चौकशी करण्यासाठी ईडीकडे तक्रार अर्ज देणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

ज्येष्ठ संचालकांचे निकटवर्तीयही चौकशीच्या फेऱ्यात

ज्येष्ठ संचालकांनी भष्टाचारातील पैसे त्यांचे निकटवर्तीय, स्वीय सहायक, सुपरवायझर, चालक यांच्या नावे मुरवले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यांच्याही मालमत्तांची माहिती घेतली आहे. ज्येष्ठ संचालकांसह निकटवर्तीयांच्याही चौकशीची मागणी करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ईडी चौकशी लागल्यास संचालकांचे निकटवर्तीयही चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news