

कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत महायुतीची लवकरच बैठक होईल. या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडीबाबतची रणनिती ठरवली जाईल. दोन्ही आघड्या एकत्र येण्याबाबत सध्यातील दोन्ही बाजूने कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे सांगत बैठकीमध्ये याबाबत निर्णय होईल, असे खा. धनंजय महाडिक यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे दोन्ही आघाड्या अध्यक्ष निवडीसाठी एकत्र येणार याबाबत खा. महाडिक यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात महायुतीमध्ये सध्या कोणत्याही हालाचाली नाहीत. अध्यक्ष पदाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वयाबाबत सध्या कोणत्याही हालचाली नाहीत. पण याबाबत लवकरच महायुतीची बैठक होईल, असे खा. महाडिक यांनी सांगितले.