Gokul Chairman Selection : गोकुळच्या अध्यक्ष निवडीत महायुतीचे ‘ऑपरेशन गोकुळ’; ४ शासननियुक्तांसह १६ संचालक बैठकीस राहणार उपस्थित

मुश्रीफ-के.पी. मैत्रीतून रणजीत पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब? सोमवारी मध्यरात्री संचालक कोल्हापुरात दाखल होणार : विकासवाडीतील गुप्त बैठकीत रणनीती निश्चित
Gokul Chairman Election
Published on: 
Updated on: 

आशिष ल.पाटील

गुडाळ : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या १० नोव्हेंबर रोजी होणार्‍या अध्यक्ष निवडीसाठी ४ शासननियुक्त संचालकांसह महायुतीचे सर्व १२ निर्वाचित संचालक उपस्थित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी दुपारी विकासवाडी (ता. करवीर) येथे महायुतीच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थित बैठकीत झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

विशेष म्हणजे या बैठकीस शासनाकडून अध्यादेशाद्वारे मतदानाचा अधिकार प्राप्त झालेले चार नूतन शासननियुक्त संचालकही उपस्थित होते.

दरम्यान, महायुतीचे सर्व संचालक अद्यापही राजस्थानमध्ये असून ते सोमवारी रात्री कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. नव्या शासन निर्णयाप्रमाणे नियुक्ती झालेल्या चार शासननियुक्त संचालकांना नियुक्तीचे आदेशि नघालेले असून त्याविषयी गुप्तता पाळण्यात आलेली आहे. त्याची एक प्रत सोमवारीच उपविभागीय अधिकारी तथा 'गोकुळ'च्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मौसमी चौगले यांना देण्यात येणार आहे.

मुंबईत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत अध्यक्ष पदाचे रोटेशन ठरले असून प्रथम राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद जाईल, त्यानंतर भाजपा, शिवसेना आणि जनसुराज्यला हे पद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादीमध्ये माजी आमदार राजेश पाटील आणि रणजीतसिंह कृष्णराव पाटील या दोन अनुभवी संचालकांच्या बरोबरच राहुल पाटील (सडोलीकर) हेही दावेदार आहेत. मात्र मंत्री हसन मुश्रीफ हे के. पी. पाटील यांच्या मैत्रीला जागून रणजीत पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे. १० नोव्हेंबर रोजी होणार्‍या अध्यक्ष निवडीवेळी गोकुळ प्रकल्पावर महायुतीच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णयही महायुतीच्या नेत्यांनी रविवार दुपारच्या बैठकीत घेतला आहे.

दरम्यान ११ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गोकुळच्या अध्यक्षनिवडी संदर्भातील याचिकेवर सुट्टीकालीन न्यायमूर्ती समोर सुनावणी होणार असून या सुनावणीवर १० नोव्हेंबरच्या अध्यक्ष निवडीचे भवितव्य अवलंबून राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.