Gokul Election | अवसायनातील दूध संस्थांचा सोमवारी लागणार ‘निकाल’

Gokul Election |
Gokul Election | अवसायनातील दूध संस्थांचा सोमवारी लागणार ‘निकाल’
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’ संलग्न अवसायन प्रक्रियेतील 1,320 दूध संस्थांचा ‘बॉम्ब’ सोमवारी फुटणार आहे. यामधील किती संस्था मतदानास पात्र ठरणार आणि अपात्र ठरणार, याची स्पष्टता मिळणार आहे. सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचे निकाल तयार करण्याचे काम सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयात सुरू झाले आहे. सहायक निबंधक कृष्णा ठाकरे अवसायनातील दूध संस्थांचा निकाल देतील.

‘गोकुळ’ने 5,470 संस्था सभासदांची मतदारयादी सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर केली होती. यामधील 1,320 दूध संस्थांवर तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात चाललेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायनातील 1,320 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून संस्था पात्र-अपात्रचा निर्णय घ्या, ही सर्व प्रक्रिया 80 दिवसांत पूर्ण करा, असा आदेश दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news