Gokul dairy controversy | ‘गोकुळ’वर उद्या प्रशासक, मुश्रीफ आज सुप्रीम कोर्टात

Gokul dairy controversy |
Gokul dairy controversy | ‘गोकुळ’वर उद्या प्रशासक, मुश्रीफ आज सुप्रीम कोर्टातPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत सोमवारी (दि. 4) संपत असल्याने मंगळवारी (दि. 5) गोकुळचा कारभार प्रशासकांच्या हातात येणार आहे. प्रशासकाचे नाव मुंबईतून मुख्यमंत्री निश्चित करतील; तर कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळबाबत दिलेल्या निर्णयाला चेअरमन नविद मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेनेचे संचालक दिल्लीत आव्हान देणार आहेत. यासंदर्भातील ते सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील. त्यामुळे या सुनावणीकडेही लक्ष असणार आहे.

प्रशासक नियुक्तीवरून सध्या गोकुळचे राजकारण तापले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून गोकुळवर प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू आहेत; तर अखेरच्या क्षणापर्यंत प्रशासक नियुक्ती थांबविण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गोकुळमधील राष्ट्रवादी, शिवसेनेचे संचालक सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. यासंदर्भात शनिवारी जिल्हा बँकेत मंत्री मुश्रीफ व संचालकांची बैठकही झाली. प्रशासक नियुक्तीच्या तोंडावर ही सुनावणीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पोलिस बंदोबस्ताने तणाव

कागदपत्रे नष्ट करण्याच्या चर्चेमुळे गोकुळच्या गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क आणि मुंबईतील वाशी येथील कार्यालयात शनिवारी रात्री पोलिस बंदोबस्तासाठी दाखल झाले. काही वेळ थांबून मध्यरात्री निघून गेले. यामुळे रविवारी दिवसभर वातावरण तणावपूर्ण होते.

प्रशासक नियुक्तीमुळे गोकुळमधील काही कागदपत्रे नष्ट केली जाण्याचा संशय आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोकुळच्या कार्यालयात पोलिस बंदोबस्त पाठविण्यात आला. अचानक आग लागण्याच्या भीतीमुळे अग्निशमन यंत्रणाही सतर्क ठेवली होती.

प्रकाश बेलवाडे, तक्रारदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news