Goa-Made Liquor Seizure | शिनोळी-कर्नाटक राज्य हद्दीवर ३५ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

‘पुष्पा’ स्टाईल तस्करी; मासे वाहतूक करणाऱ्या कोल्ड स्टोअरेज वाहनाचा वापर
शिनोळी : कर्नाटक राज्य हद्दीवर जप्त करण्यात आलेले मासे वाहतुकीचे कोल्ड स्टोअरेज.
शिनोळी : कर्नाटक राज्य हद्दीवर जप्त करण्यात आलेले मासे वाहतुकीचे कोल्ड स्टोअरेज.
Published on: 
Updated on: 

चंदगड : चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातून बेळगाव जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा प्रकार शिनोळी (ता. चंदगड) येथील राज्य हद्दीवर उघडकीस आला. मासे वाहतूक करणाऱ्या वाहनातून गोवा - दोडामार्ग चेक पोस्ट ते तिलारी घाटमार्गे शिनोळीतून कर्नाटक हद्दीत प्रवेश करताच बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे वाहन जप्त केले.

शिनोळी राज्य हद्दीवर वैभव हॉटेल जवळ ही कारवाई करण्यात आली. २० लाख रुपयांचे वाहन व ३५ लाख २८ हजार रुपयांची दारू असा ५५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा प्रकार जणू ‘पुष्पा’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या तस्करीसारखा आहे. चंदगडचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी तिलारी घाटातून येणाऱ्या गोवा बनावट दारूविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता तस्करीसाठी चक्क मासे वाहतूक करणाऱ्या कोल्ड स्टोअरेज वाहनाचा वापर करण्यात आला. ही कारवाई उत्पादन कर्नाटक बेळगाव उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर आयुक्त वाय. मंजुनाथ, सहआयुक्त एफ. एच. चलवादी व जगदीश एन. के. या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.

ओशन फिशर ही कंपनी गोवा येथून तिलारी घाटातून बेळगाव शहरात मासे वाहतूक करणारी कंपनी आहे. या कंपनीचे हे कोल्ड स्टोअरेज वाहन आहे. यामध्ये पाठीमागे मासे भरलेले ट्रे थप्पी मारले होते; तर आतमध्ये सुमारे १८० मिली प्रति बाटली असणारी ३५ लाख २८ हजार रुपयांची दारू उघडकीस आली. संबंधित वाहन थांबवून चौकशी करत असतानाच अंधाराचा फायदा घेत चालक व वाहक घटनास्थळावरून पळून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.