Girl Assault Case | विनयभंगाला प्रतिकार करणार्‍या मुलीवर खुनीहल्ला; नराधमाला 10 वर्षे कारावास

कागल तालुक्यातील खटल्याचा निकाल
Girl Assault Case
Girl Assault Case | विनयभंगाला प्रतिकार करणार्‍या मुलीवर खुनीहल्ला; नराधमाला 10 वर्षे कारावास
Published on
Updated on

कोल्हापूर : विनयभंगाला प्रतिकार करणार्‍या अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी करणार्‍या कौलगे (ता. कागल) येथील अनिल निवृत्ती कांबळे (वय 55) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 3 तथा विशेष पोक्सो न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी शुक्रवारी दोषी ठरविले. नराधमाला 10 वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

दि. 26 जून 2017 मध्ये ही घटना घडली होती. नराधमाने अल्पवयीन मुलीच्या हत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पीडित मुलीने नराधमाविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी त्याला तत्काळ बेड्या ठोकल्या होत्या. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. व्ही. हंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केले होते.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. दि.26 जूनला सायंकाळी 5 वाजता पीडित मुलगी घरी एकटीच असताना आरोपी अनिल कांबळे घरात आला. त्याने पीडितेच्या घराचा दर्शनी बाजूचा दरवाजा बंद केला. आरोपीचा वाईट हेतू लक्षात येताच मुलगी सावध झाली.

मुलीने मी आरडाओरडा करेन, असे आरोपीला बजावले. त्यानंतर नराधमाने खिशातील धारदार शस्त्राने मुलीवर हल्ला केला. मानेवर, हातावर, खांद्यावर तसेच पाठीवर वर्मी हल्ला झाल्याने मुलीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. मदतीची याचना केली. आरडाओरड झाल्याने आरोपी अनिल कांबळे चाकूसह घरातून पळून गेला. फिर्याद दाखल होताच मुरगूड पोलिसांनी नराधमाला अटक केली. खटल्याच्या सुनावणीत विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. अमिता कुलकर्णी यांनी 8 साक्षीदार तपासत युक्तिवाद केला. त्या आधारे 10 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news