Gaur Sighting | आंबा-विशाळगड मार्गावर गव्याचा मुक्त संचार; वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण

Kolhapur News | आंबा ते विशाळगड हा मार्ग घनदाट झाडी आणि अभयारण्याला लागून असल्याने येथे वन्यजीवांचे वास्तव्य नेहमीच
Amba Vishalgad road Gaur sighting
Amba Vishalgad road Gaur sightingPudhari
Published on
Updated on

Amba Vishalgad road Gaur sighting

​विशाळगड : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या ऐतिहासिक विशाळगड परिसरात सध्या वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून आंबा-विशाळगड मार्गावर भररस्त्यात गव्याचे दर्शन होत असून, हा गवा कोणत्याही भीतीशिवाय रस्त्यावर मुक्तपणे चरताना दिसत आहे. या प्रकारामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आंबा ते विशाळगड हा मार्ग घनदाट झाडी आणि अभयारण्याला लागून असल्याने येथे वन्यजीवांचे वास्तव्य नेहमीच असते. मात्र, सध्या एका गव्याने आपला मुक्काम थेट मुख्य रस्त्यावरच ठोकला आहे. हा गवा रस्त्याच्या कडेला असलेले गवत खाण्यात इतका मग्न असतो की, जवळून जाणाऱ्या वाहनांची किंवा माणसांची त्याला फारशी फिकीर उरलेली दिसत नाही. अनेक पर्यटकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी या गव्याचे दर्शन घेतले असून, काहींनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

Amba Vishalgad road Gaur sighting
Kolhapur murder news | कोल्हापूर हादरले! रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून अमानुष खून; मणेरमळा परिसरात खळबळ

भररस्त्यात गव्याचे दर्शन होत असल्याने वन विभागाने पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. "गवा हा शांत प्राणी असला तरी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे गव्याला पाहिल्यानंतर वाहने थांबवू नयेत किंवा फोटो काढण्यासाठी खाली उतरू नये," असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे..

विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे दर्शन थोडे धडकी भरवणारे ठरत आहे. वळणावळणाच्या रस्त्यावर अचानक समोर गवा आल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news