

सुनील कांबळे
नागाव : शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापारी (उेााशीलळरश्र) गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने उद्योजक संकटात सापडले आहेत. गॅसअभावी अनेक लघु आणि मध्यम स्वरूपाचे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
नेमकी अडचण काय?
शिरोलीमधील बहुतांश कास्टिंग, फोर्जिंग आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये भट्टी (र्ऋीीपरलश) आणि कटिंग कामासाठी मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅसचा वापर केला जातो. मात्र, गेल्या आठवड्यापासून पुरवठादारांकडून गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध होत नसल्याने कारखानदारांची धावपळ होत आहे.
उद्योजकांसमोरील संकटे
उत्पादन थांबले : गॅसअभावी काम थांबल्याने ठरवून दिलेल्या वेळेत ऑर्डर पूर्ण करणे अशक्य झाले आहे.
कामगारांचे स्थलांतर
काम नसल्याने रोजंदारीवर काम करणार्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून कामगार पुन्हा गावाकडे परतण्याची भीती आहे.
मागणी आणि पाठपुरावा
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि संबंधित गॅस कंपन्यांकडे पाठपुरावा केला जात आहे. व्यापारी गॅसचा कोटा तातडीने वाढवून मिळावा आणि काळा बाजार थांबवावा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
आर्थिक फटका
बँकांचे हप्ते, वीज बिले आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे, या चिंतेत उद्योजक आहेत.