कोल्हापुरात गॅस सिलिंडरसाठी आजपासून मोजावे लागणार 856

50 रुपयांची वाढ; गृहिणींचे बजेट कोलमडणार
gas-cylinder-to-cost-856-in-kolhapur-from-today
कोल्हापुरात गॅस सिलिंडरसाठी आजपासून मोजावे लागणार 856file photo
Published on
Updated on

कोल्हापूर : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील 7 लाख 38 हजार 576 ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. प्रति सिलिंडर 50 रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. दरम्यान, गॅस दर वाढल्याने आजपासून एका सिलिंडरसाठी 856 रुपये तर उज्ज्वला गॅस कनेक्शनधारकांना 556 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या कोल्हापुरात सिलिंडरचा दर 806 रुपये होता.

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन व इंडियन ऑइल कार्पोरेशन या तीन कंपन्यांमार्फत कोल्हापुरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. या तीन कंपन्यांचे मिळून कोल्हापूर शहरात 1 लाख 20 हजार तर जिल्ह्यात 7 लाख 38हजार 576 गॅस ग्राहक आहेत. यापूर्वी घरगुती गॅस दरवाढ ऑगस्ट 2024 मध्ये केली होती. त्यानंतर सहा महिने गॅसचे दर स्थिर होते. मात्र आता 50 रुपयांची वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे.

ही गॅस दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी असून आठ एप्रिल पासून नवीन दरवाढ लागू होणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. 2024 च्या 8 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करत सरकारने महिलांना दिलासा दिला होता, मात्र वर्षभरातच 50 रुपयांची दरवाढ करून महिलांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच झटका दिला आहे. दरम्यान, स्वयंपाकाच्या गॅस दरवाढी विरोधात नागरिक तीव— प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. बहुतांशी महिलांनी या दरवाढीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसारख्या जीवनावश्यक वस्तूचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news