Ganpatrao Killedar Patil | गणपतराव किल्लेदार-पाटील यांचे कोल्हापुरात निधन

Ganpatrao Killedar Patil
Ganpatrao Killedar Patil | गणपतराव किल्लेदार-पाटील यांचे कोल्हापुरात निधन
Published on
Updated on

कोल्हापूर : एस. टी. कॉलनी राजारामपुरी येथील सेवानिवृत्त अभियंता गणपतराव रामचंद्र किल्लेदार-पाटील (वय 80) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी श्रीमती गीता किल्लेदार, मोठा मुलगा स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रणजित किल्लेदार, सून डॉ. निकिता किल्लेदार, लहान मुलगा अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ अभिजित किल्लेदार आणि भाऊ सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शंकरराव किल्लेदार, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

गुरुवारी राजारामपुरीतील आशीर्वाद या त्यांच्या निवासस्थानापासूनच्या अंत्ययात्रेनंतर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, निवृत्त डीवायएसपी प्रकाश पाटील, डॉ. अभय शिर्के, सुभाष अतिग्रे, डॉ. उदय पाटील, डॉ. प्रसाद हलकर्णीकर, डॉ. मिलिंद पिशवीकर, डॉ. मनीष नागावकर, डॉ. तानाजी पाटील, डॉ. राजाराम पाटील, डॉ. दादासो पाटील, डॉ. अजित कदम, डॉ. अमेय पठाडे, सचिन कणसे, हेमंत पाटील, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, रामदास पाटील, जे. बी. पाटील, संजय सावंत, यमगेचे सरपंच संदीप पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मूळचे यमगे (ता. कागल) येथील गणपतराव किल्लेदार सन 1967 ते 1990 या कालावधीत दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री येथे डेप्युटी चीफ इंजिनिअर म्हणून सक्रिय होते. 1990 ते 1995 या कालावधीत दत्त आसुर्ले-पोर्ले येथे चीफ इंजिनिअर म्हणून ते रुजू झाले. या कालावधीत त्यांनी कारखान्याला गोल्ड मेडलसह विविध मानसन्मान मिळवून दिले. त्यांच्या या कारकिर्दीची दखल घेऊन 1995 ते 2000 या कालावधीत राजारामबापू सहकारी कारखाना इस्लामपूर यांनी त्यांच्यावर चीफ इंजिनिअर म्हणून जबाबदारी सोपविली. या कालावधीतही त्यांनी कारखान्यास सुवर्णपदक मिळवून दिले. याबद्दल वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटतर्फे त्यांचा बेस्ट चीफ इंजिनिअर म्हणून विशेष गौरव करण्यात आला. 2000 ते 2006 या कालावधीत भोगावती साखर कारखान्यातील सेवेनंतर 2007 ते 2010 या कालावधीत रेणुका शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते निवृत्त झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news