Kolhapur Crime News | गुंडांची धमकी; दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची भीती

Kolhapur Crime News |
Kolhapur Crime News | गुंडांची धमकी; दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची भीतीfile photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : महिला व्यावसायिक गीता मोरे यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी सहा लाख रुपये घेतले. आर्थिक अडचण हेरून सावकारांनी मोरे यांच्याकडून पाच वर्षांत तब्बल अडीच कोटी उकळल्याचे समोर आले. कधी गुंडांची भीती, कधी दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण अशा कारणांनी दबावाखाली ठेवून रक्कम उकळली.

गीता मोरे यांनी २०२१ मध्ये सिद्धेश गायकवाडकडून १० टक्के व्याजाने सहा लाख रुपये घेतले. ही रक्कम वेळेत परत न केल्यामुळे दंडासह १२ लाखांची मागणी गायकवाडने केली. या १२ लाखांचे तब्बल २ कोटी ५२ लाख ५४ हजार, ९२२ रुपये देऊनही उर्वरित रकमेसाठी गायकवाडने मोरे यांच्याकडे तगादा लावला.

वसुलीसाठी सराईत गुंडांच्या नावाचा वापर

पैसे वसूल करण्यासाठी गायकवाड याने स्वप्निल जाधव, बल्ली भाई, अजित तिवडे यांच्या गॅँगच्या नावाने धमकी देऊन वसुली केली. पैसे दिले नाहीत, तर ठार मारण्याची धमकी देत, दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचीही धमकी दिली. मोरे यांच्यासह त्यांच्या आई व इतर नातेवाईकांनाही वसुलीसाठी धमकावल्याचे समोर आले.

दागिने गहाण ठेवले, परस्पर नेले

मोरे यांनी त्यांच्यासह नातेवाईकांचे २० तोळे सोने विठ्ठल रायकर या सराफाकडे गहाण ठेवून गायकवाडला रक्कम दिली. गायकवाडने सराफाची रक्कम भागवून परस्परच मोरे यांचे दागिनेही हडप केले. संशयितांनी गीता मोरे यांच्याकडून नोटरी करून घेऊन चेक, एटीएम कार्ड काढून घेतले. त्यांच्या खात्यावर जमा होणारी रक्कमही परस्पर एटीएममधून काढून घेतल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news