Phulewadi murder case | फुलेवाडीत गुंडाचा घरात घुसून खून; वाहने, घराचीही तोेडफोड

मध्यरात्री थरार, एक गंभीर; परिसरात दहशत
Phulewadi murder case
Phulewadi murder case | फुलेवाडीत गुंडाचा घरात घुसून खून; वाहने, घराचीही तोेडफोडPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून घरात घुसून तलवारीचे सपासप वार करत महेश रांजेद्र राख (वय 27, रा.अहिल्यादेवी होळकर नगर, फुलेवाडी रिंगरोड) या रेकॉर्डवरील गुंडाचा खून केला. फुलेवाडी रिंगरोड परिसरातील गंगाई लॉनजवळ शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. आठ ते दहा जणांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा मित्र विश्वजीत भगोजी भाले (20, रा. गंधर्वनगरी, फुलेवाडी ) हा गंभीर जखमी झाला.

हल्लेखोर आणि विश्वजीत भाले यांच्यात किरकोळ कारणावरून शुक्रवारी रात्री वाद आला होता. या वादातून हल्लेखोरांनी रात्री साडे दहाच्या सुमारास भाले याच्या घरात घुसून हल्ला केला. त्याच्या दारातील वाहनांची तोडफोड करत,घरासमोर मोठ्या प्रमाणात बाटल्या फोडल्या. त्यानंतर हल्लेखोर निघून गेले.

हा प्रकार समजताच भालेचा मित्र महेश राख त्याच्या घरी आला.ही माहिती मिळताच हल्लेखोर तलवार,एडका अशी धारधार शस्त्रास्त्रे घेऊन घटनास्थळी आले. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यातून त्यांनी महेश आणि भाले यांच्यावर हल्ला चढवला. सपासप वार झाल्याने महेश जागीच कोसळला. यानंतर हल्लेखोर पसार झाले. महेश आणि भाले यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच महेशचा मृत्यू झाला होता. हल्लेखोर हे वारे वसाहत परिसरातील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news