Kolhapur Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून १० लाख लुटणारी टोळी गजाआड

Kolhapur Crime |
Kolhapur Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून १० लाख लुटणारी टोळी गजाआड(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कुरुंदवाड : मजरेवाडी (ता. शिरोळ) दरम्यानच्या टाकळीवाडी रस्त्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून १० लाख ३५ हजार २०० रुपयांची रोकड लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. मेहरम अल्ताफ सरकावस (रा. घटप्रभा, जि. बेळगाव), सुनील निवृत्ती पाटील (रा. कुगनूर, जि. बेळगाव), प्रवीण जयसिंग आकुर्डे (रा. पिंपळगाव, ता. कागल) आणि सुरेश शिवाजी तांबे (रा. तिकोंडी, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ७ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.

भिमाशंकर मल्लेश पाटील (रा. बेळनोडगी, ता. जत) यांना एका अनोळखी महिलेने ८० हजार रुपये तोळा दराने स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून पाटील हे रक्कम घेऊन आले असता, १५ मे रोजी टाकळीवाडी मार्गावर संशयित आरोपींनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले होते. मुस्ताकसाहेब हुसेन पटेल (वय ५८, रा. बस्तवाड, ता. शिरोळ) याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी केली असता चौघांची नावे निष्पन्न झाली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने व पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news