

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक मार्गात सहभागी होण्यासाठी मंडळांना शहरातील 9 मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. उमा टॉकीज, आझाद चौक, बिंदू चौक, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, पापाची तिकटी या समांतर मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, आझाद चौकातून पुढे, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नरमार्गे पुढे, फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौकमार्गे पुढे, नंगीवली चौक, कोळेकर तिकटीमार्गे मिरजकर तिकटी, खरी कॉर्नरमार्गे बिनखांबी गणेश मंदिर चौक, ताराबाई रोडवरून महाद्वार रोडवर गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.
1 शिवाजी पेठ, मंगळवार पेठ येथील मंडळांच्या वाहनाकरिता : रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल पुढे तपोवन मैदान येथे थांबून राहतील. इंदिरासागर संभाजीनगर येथील वाहतूक सुरळीत असेल तर आवश्यकतेनुसार तपोवन येथे पार्क केलेली वाहने टप्प्या टप्प्याने सोडण्यात येणार आहेत.
2 राजारामपुरी येथील मंडळाच्या वाहनांकरिता : रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेलचे पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन जरगनगर, आर. के. नगर, शेंडा पार्क येथून सुभाषनगर, उद्यमनगर अगर सायबर चौकमार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
3 शाहूपुरी, लक्ष्मीपुरी येथील मंडळाच्या वाहनांकरिता : रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेलचे पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन जरगनगर, आर. के. नगर येथून शेंडा पार्क येथून सुभाषनगर उद्यमनगर-पार्वती सिग्नलमार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
1 रत्नागिरीमार्गे कोल्हापूर शहरात येणारी वाहतूक शिवाजी पूल, सी.पी.आर. चौक येथे येईल. शहरातून पन्हाळ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सी.पी.आर. चौक, तोरस्कर चौक, शिवाजी पूलमार्गे मार्गस्थ होतील.
2 कोल्हापूर शहरातून गारगोटी, राधानगरी, गगनबावड्याकडे जाणारी वाहतूक ताराराणी पुतळा, रेल्वे उड्डाणपूल, हायवे कॅन्टीन चौक, सायबर कॉलेज चौक, रिंग रोडमार्गे हॉकी स्टेडियम येथून डावीकडे वळण घेऊन रामानंदनगर, कळंबा जेल, साई मंदिर रिंग रोड, नवीन वाशी नाका, फुलेवाडी रिंग रोडने पुढे जातील.