

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरामध्ये रस्त्यावरील एका निर्जन भागात असलेल्या बंद पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या तीनपानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर सायबर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून उद्ध्वस्त केला. या कारवाईत 65 जणांना अटक करण्यात आली, तर एक फरार झाला आहे.
इचलकरंजी शहरातील 18, जयसिंगपुरातील 2 तर गणेशवाडी (ता. शिरोळ) आणि कोल्हापूर शहरातील प्रत्येकी 1 अशा कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 22 जणांचा अटक झालेल्यांत समावेश आहे. घटनास्थळी सुमारे 5.19 लाख रुपये रोख, मोबाईल, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 62 लाख 94 हजार 30 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे सांगलीचे कॅप्टन पट्टेराव गुंडवाडे यांनी फिर्याद दाखल केली.
याबाबतची माहिती अशी की, कवठेमहांकाळ शिवारात अजित बाळासाहेब माने यांच्या मालकीचा बंद पोल्ट्री फार्म आहे. याठिकाणी तीनपानी पत्त्यांचा जुगार सुरू होता. संशयित शहाबाज खुदाबक्ष कुरणे (वय 30, रा. मिरज) व मुस्ताक यासीन मुल्ला (28, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हे दोघे जुगार अड्ड्याचे चालक आहेत. जुगार सुरू असताना सायबर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी शनिवारी सायंकाळी अड्ड्यावर छापा टाकला. त्यांना जुगाराचे साहित्य, 5.19 लाख रुपये रोख, 48 मोबाईल, 17 दुचाकी व 5 चारचाकी वाहने असा एकूण 62 लाख 94 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये दोघा मुख्य संशयितांसह 65 जणांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक मसाळे करीत आहेत.
याप्रकरणी 66 जणांवर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शाहबाज कुरणे (रा. मिरज), मुस्ताक यासिन मुल्ला (रा. इचलकरंजी), द्वारकाधीश नारायण खंडेलवाल (रा. कोल्हापूर), दीपक चंद्रकांत गडदे (रा. सांगली), सुनील सुहास काळे (रा. मिरज), आण्णाप्पा बसाप्पा कोकळे (रा. अथणी), साहिल बसीर मोमीन (रा. मिरज), ऋत्विक शिवाजी कवले (रा. इचलकरंजी), अली हुसेन खान (रा. इचलकरंजी), रमेश नंदाप्पा पाथरवट (रा. अथणी), सतीश कृष्णा सुर्वे (रा. इचलकरंजी), आकाश दत्तात्रय कौलवार (रा. पंढरपूर), जब्बार मेहबूब मणेर (रा. मिरज), सोमनाथ उत्तम झिझुरटे (रा. पंढरपूर), नागेश बाबासोा होनमोरे (रा. कवठेमहांकाळ), शेखर अनिल कांबळे (रा. शिनाळ), मोहसिन मुबारक सत्तारमेकर (रा. मिरज), सलीम कबीर मुलाणी (रा. इचलकरंजी), सागर संजय जगताप (रा. तासगाव), अनिल निवृत्ती लोहार (रा. इचलकरंजी), राहुल सुनील दुर्वे (रा. इचलकरंजी), प्रकाश रवींद्र हुंडेकरी (रा. इचलकरंजी), साहिम नियाज शिकलगार (रा. मिरज), महारूप मियासाब काझी (रा. मिरज), गोरख पांडुरंग निकम (रा. तंगडी- अथणी), रॉबिन ऐटासीन बाल (रा. काठमांडू, सध्या रा. इचलकरंजी), महेश बाबू कोयलकोंडा (रा. इचलकरंजी), फिरोज अल्ताफ बागवान (रा. मिरज), फरदिन सादिक इनामदार (रा. इचलकरंजी), सादिक ईस्माईल देसाई (रा. मिरज), शुभम सरदार सातपुते (रा. मिरज), अरिहंत बाबासोा नारगुडे (रा. इचलकरंजी), शाहरुख रज्जाक शेख (रा. मिरज), जासिम जावेद जमानवाले (रा. मिरज), जावेद अब्दुल आलासे (रा. मिरज), तौफीक युसूफ रज्जनवार (रा. इचलकरंजी), लहू भैरू घाटगे (रा. इचलकरंजी), श्रीकांत वासुदेव पेटकर (रा. तासगाव), मानतेश बसाप्पा कलमडी (रा. अथणी), विलास पेरगोंडा कलमडी (रा. अथणी), संतोष सुभाष हातलगी (रा. जयसिंगपूर), किरण अशोक भोसले (रा. तासगाव), रामचंद्र ज्ञानू सोलंदकर (मोळे - टा. कागवाड), नमन पंडित पोखलीयाल (रा. इचलकरंजी), राजकुमार रावसाहेब पाटील (रा. गणेशवाडी, ता. शिरोळ), रणजित लक्ष्मण सूर्यवंशी (रा. मिरज), अमोल बापू घळगे (रा. अंकली), प्रणय पुरण राणा (रा. इचलकरंजी), शिवानंद बाळाप्पा कायपुरे (रा. अथणी), राजेंद्र महादेव धुमाळ (रा. जयसिंगपूर), कोमल यशवंत पाटोळे (रा. इंगळी, ता. चिक्कोडी), संदीप रावसाहेब कोळी (रा. इंगळी, ता. चिक्कोडी), अख्तर औरंगजेब झाडवाले (रा. बनहट्टी, ता. जमखंडी), रमेश परशुराम उगारे (रा. तंगडी, ता. अथणी), इम्रान मुस्तफा बेपारी (रा. मिरज), ऋषीकेश चंद्रकांत घाटगे (रा. सांगली), रियाज अहमद नूरजमाल मोमीन (रा. इचलकरंजी), अक्षय राजेश देशमुख (रा. तासगाव), युवराज अशोक जाधव (रा. सांगली), श्रावण गुरुबसू नाटेकर (रा. इनाम धामणी), देवराज आण्णाप्पा सुतार (रा. तंगडी, ता. अथणी), श्रीकांत अशोक राजंगळे (रा. इचलकरंजी), हणमंत गंगाप्पा कांबळे (रा. तेवरहट्टी, ता. अथणी), असिफ नसीरखान पठाण (रा. इचलकरंजी) यांचा समावेश आहे. यापैकी दर्याप्पा परमेश्वर माळी (रा. अथणी, जि. बेळगाव) हा फरार झाला आहे.