

कोल्हापूर : सडोली खालसा (ता. करवीर) येथे शेतात जनावरांच्या गोठ्यात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री करवीर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये जागामालकासह १३ जणांना ताब्यात घेऊन आठ दुचाकी, १२ मोबाईल, रोख ४३ हजार असा सुमारे तीन लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जयदीप गोविंद पाटील (वय ३५, रा. हळदी, ता. करवीर), धीरज महादेव मोहिते (३२), सनी अशोक महापुरे पाटील (३५, दोघे रा. सडोली खालसा), रवींद्र आकाराम कांबळे (४०, रा. वाशी, ता. करवीर), तुषार तानाजी पाटील (३०, रा. सडोली खालसा,) कृष्णात शशिकांत मदने (२९, रा. रामोशी गल्ली, ईश्वरपूर, ता. वाळवा), उत्तम वसंत पाटील (५३, रा. कोथळी, ता. करवीर), विठ्ठल लक्ष्मण खाडे (४०, रा. सडोली खालसा), सागर लक्ष्मण सातपुते (३५, रा. प्रथमेशनगर, वाशी नाका), शिवाजी पाटील (३७, रा. हळदी, ता. करवीर), सर्वेश जाधव (२२), वैभव पाटील (३१), जागा मालक गणपत वसंत पाटील (५६, तिघे रा. सडोली खालसा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.