Gadhinglaj news | गडहिंग्लजचे नगराध्यक्ष तुरबतमठ यांना जात पडताळणीची नोटीस

Gadhinglaj news |
Gadhinglaj news | गडहिंग्लजचे नगराध्यक्ष तुरबतमठ यांना जात पडताळणीची नोटीस
Published on
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लजचे लोकनियुक्त नगराध्यक्ष महेश महादेव तुरबतमठ यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांना दक्षता पथकाच्या अहवालानुसार कारणे दाखवा नोटीस पाठविली असून 7 एप्रिल रोजी सुनावणीसाठी लेखी म्हणणे सादर करण्याबरोबरच व अधिकचे पुरावे देण्याबाबत स्पष्ट केले आहे. तुरबतमठ यांनी सादर केलेले पुरावे प्रथमदर्शनी विश्वासार्ह नाहीत असा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आक्षेप आहे.

तुरबतमठ यांनी सादर केले तीन पुरावे... पण

गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना दिलेले तीनही पुरावे अमान्य असल्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे मत आहे. यातील पहिला पुरावा तर ग्राह्य धरता येत नसल्याचे समितीने म्हटले आहे.

पुराव्यामध्ये पहिला पुरावा शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये जन्म साल 1977, शाळा प्रवेश सन 1993, जातीच्या रकान्यात बेडाजंगम नमूद आहे. दुसरा पुरावा महादेव शंकरय्या तुरबतमठ ऊर्फ मठपती यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये जन्म सन 1934, शाळा प्रवेश सन 1942, जातीच्या रकान्यात हिंदू व लिंगायत बेडाजंगम नमूद आहे. तिसरा पुरावा गडहिंग्लज येथील सन 1945 सालातील शंकरय्या गुरुसातय्या मठपती यांच्या नावे असलेला मालमत्तापत्रक उतारा याचीही नोंद त्यामध्ये दिली आहे.

यानुसार पहिला पुरावा अलीकडच्या काळातील असून तो ग्राह्य धरण्यात येत नाही. दुसर्‍या पुराव्यामध्ये पोलिस दक्षता पथकाने तपासलेला त्यामध्ये बेडाजंगम व शब्दामध्ये शाई बदल व अक्षर बदल असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पुरावा क्र. 3 मध्ये जातीची नोंद नाही. त्यामुळे पुरावे क्र. 2 व 3 ग्राह्य धरण्यात येणार नाही. सबब पोलिस दक्षता पथकाच्या अहवालावरून तुरबतमठ यांचा बेडाजंगम जातीचा दावा सिद्ध होत नाही. त्यामुळे हा जातीचा दावा का फेटाळण्यात येऊ नये, याबाबत लेखी पुरावा व अधिकचे पुरावे 7 एप्रिल रोजी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सुनावणीकडे लक्ष

गडहिंग्लज पालिकेच्या नगराध्यक्षपदाबाबत झालेल्या या हालचालीमुळे गडहिंग्लजमध्ये खळबळ उडाली असून आता यात पुढे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news