Gadhinglaj Soldier Death | दिल्लीमधील अपघातात गडहिंग्लजच्या जवानाचा मृत्यू

चारचाकी वाहनाची दुचाकीला जोराची धडक
Delhi Accident Kadgaon Soldier Death
अक्षय चौगुले Pudhari
Published on
Updated on

Delhi Accident Kadgaon Soldier Death

गडहिंग्लज: दिल्ली येथे मेरठ युनिटमध्ये कार्यरत असलेल्या अक्षय विलास चौगुले (रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) या जवानाचा दिल्लीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते घरातून युनिटमध्ये जात असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्यांनी पत्नीला दिल्ली येथे सोबत नेल्याने ते कॉटर्समध्ये राहत होते. कडगावमधील त्यांचे नातेवाईक दिल्ली येथे पोहोचले आहेत. शुक्रवारी किंवा शनिवारी त्यांचे पार्थिव गावी आणले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news