गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचा आज (दि. 25) दिमाखात प्रारंभ होणार आहे. शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडपात शॉपिंग, फूड कोर्ट तसेच बच्चे कंपनीसाठी आकर्षक असे अॅम्युझमेंट पार्क उभारण्यात आले आहे. सकाळी दहापासून फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमास शिवराज संकुलाचे सचिव प्रा. डॉ. अनिल कुराडे, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके उपस्थित राहणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध निर्बंध असल्याने लोकांना मनमुराद खरेदीसह लज्जतदार पदार्थ तसेच उत्सवांची संधी मिळाली नाही. यामुळे दै.'पुढारी'च्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची गेल्या आठ दिवसांपासून प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. या फेस्टिव्हलमध्ये नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांची मेजवानी तसेच बच्चे कंपनीसाठी मोठा अॅम्युझमेंट पार्क उभारण्यात आला आहे. शॉपिंगमध्ये चारचाकीपासून ते फर्निचरपर्यंत, आटा चक्की, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, फ्रीज, वॉशिंग मशिन, एलईडी टीव्ही, कपडे, मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, ब—ँडेड शूज, इमिटेशन ज्वेलरी व इतर उत्पादनांचे असंख्य स्टॉल्स असणार आहेत.
फूडस्मध्ये शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. अस्सल कोल्हापुरी झणझणीत तांबडा-पांढरा रस्ता, मटण बिर्याणी, वडा कोंबडा, चिकन बिर्याणी, कबाब, चिकन लॉलीपॉप, तंदूर, चिकन 65, फिश फ्राय, तळलेले बोंविंग, सुरमई, पापलेट यासह पावभाजी, सँडवीच, झुणका-भाकर, गोबी मंच्युरियन, व्हेज पुलाव या पदार्थांचा समावेश असणार आहे. उत्साही वातावरणात पुरेपूर आस्वाद लोकांना सहकुटुंब येथे घेता येणार आहे. या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक अर्जुन ऑईल हे आहेत. शिवराज कॉलेज मैदान, शासकीय विश्रामगृहाशेजारी, कडगाव रोड गडहिंग्लज येथे दि. 25 ते 29 मार्च या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे. त्यामुळे यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मल्हार अन् अंतरा आज भेटीला…
फेस्टिव्हलमध्ये दररोज लोकप्रिय टी.व्ही. मालिकांमधील कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. आज शुभारंभादिवशी कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' फेम मल्हार अन् अंतरा ही जोडी आपल्या भेटीला येणार आहे. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
दररोज लकी विजेत्यांना बक्षिसे
फेस्टिव्हलला भेट देणार्यांमधून दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यातील सहा विजेत्यांना अर्जुन बेकरी गडहिंग्लज यांच्या वतीने आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे. याशिवाय अर्जुन फिटनेस यांच्या वतीने जीम फीमध्ये एक महिन्याची सूट देण्यात येणार आहे.