Phulewadi Murder Case | फुलेवाडी रिंग रोड खून प्रकरणातील आणखी 6 मारेकर्‍यांची नावे निष्पन्न

सिद्धांत गवळी, ऋषभ साळोखे फरार; ‘मोका’अंतर्गत प्रस्तावाच्या हालचाली
fulewadi-ring-road-murder-case-six-accused-identified
Phulewadi Murder Case | फुलेवाडी रिंग रोड खून प्रकरणातील आणखी 6 मारेकर्‍यांची नावे निष्पन्नPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोडवर गंगाई लॉन पिछाडीस टोळीयुद्धातून तडीपार गुंड महेश राख याच्या खून प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी सहा मारेकर्‍यांची नावे करवीर पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाली आहेत. दरम्यान, गवळी टोळीचा मुख्य सूत्रधार सिद्धांत गवळी, ऋषभ साळोखे-मगर खुनाच्या घटनेनंतर फरार आहेत. फरारी संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी मार्गस्थ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, गवळी टोळीतील पोलिस दफ्तरी गुन्हेगारी कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेल्या सराईतांसह किंबहुना महेश राख खुनातील संशयितांवर ‘मोका’ अंतर्गत प्रस्तावासाठी वरिष्ठस्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. टोळीतील किमान 15 ते 17 सराईतांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव शक्य असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईसाठी पावले उचलण्यात येत आहेत.

संशयितांना लवकरच अटक करू : शिंदे

खून प्रकरणात बहुतांशी सराईत गुन्हेगार आहेत. गर्दी, मारामारी, खंडणी वसुलीचे त्यांच्यावर रेकॉर्ड आहे, तर काही संशयितांवर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धांत गवळी, ऋषभ साळोखे-मगरसह अन्य सहा संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news